काही राज्यांत उष्णतेची लाट

0
10

देशातील 14 राज्यांमध्ये पावसाची आणि 8 राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा परिणाम होईल. या राज्यांतील तापमान 43 अंशांवर पोहोचले आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. पुढील 4 दिवस म्हणजे 7 ते 10 एप्रिल दरम्यान ही उष्णतेची लाट व पाऊस येण्याची शक्यता आहे.