काश्मीरात पूर ओसरु लागला

0
98
काश्मीरात काही भागांत पुराचे पाणी आता हळूहळू ओसरू लागले आहे.

अजूनही हजारो लोक अडकून; रोगराईची भीती
काश्मीरमध्ये महाभयंकर पुर हळू हळू ओसरू लागला आहे. मात्र आता पाण्याद्वारे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पुरात उद्ध्वस्थ झालेले काश्मीर आता पूर्वपदावर येण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
दरम्यान, सुमारे १ लाख ४२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असून अजून हजारो लोक अडकून असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान उत्तर काश्मीरा अजूनही धोकादायक स्थिती असल्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला म्हणालेजम्मू काश्मीर सरकारने घेतलेल्या आढाव्यानुसार गेल्या १०९ वर्षांतील हा महाभयंकर पूर आहे. त्यात झालेले प्रचंड नुकसान पाहून सरकारने पूर ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित करावा व राज्याच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेट घेऊन केली.
दरम्यान, राज्यात पाण्यातून संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती असून जलशुद्धीकरणासाठी १३ टन पाणी शुद्धीकरण गोळ्या तसेच १.२ लाख पाण्याच्या बाटल्या शुद्ध करू शकणारे सहा प्रकल्प काल श्रीनगरला पोचले. दरम्यान, मृतांची संख्या १२९ झाली असून काल ३५ मृतदेह सापडले.