काश्मीरपुढील आव्हाने आणि सरकार

0
101

काश्मिरमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यावेळी मतदारांनी चांगला उत्साह दाखवला. काश्मिर खोर्‍या मध्ये जेथे ङ्गुटिरतावादी संघटनांचे प्राबल्य आहे, तेथेही या निवडणुकांमध्ये ६० ते ७० टक्के मतदान झालेले आहे. पण अजूनही काश्मिरमध्ये नवीन सरकार बनलेले नाही. येणार्‍या काळामध्ये ही प्रक्रिया पार पडेल आणि काश्मीरमध्ये स्थिर सरकार स्थापन होईल, अशी अपेक्षा आहे. काश्मिरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये दुसर्‍या वेळा मतदान झाले आहे. यापूर्वी २०११ मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान झाले होते. त्याहीवेळी काश्मिरी जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केले होते. मात्र २०१४ मध्ये आलेल्या पुरानंतर काश्मिर खोर्‍याच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धोका पोहोचला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने केलेल्या मदतीमुळे काश्मिरमधील अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोठी मदत झाली आहे. मात्र भारतीय सैन्याने ङ्गारसे काम केलेले नाही असा अपप्रचार ङ्गुटिरतावादी संघटनांकडून केला गेला. मात्र काश्मिरी जनतेने त्यांचे म्हणणे मानले नाही. २०१४ मध्ये काश्मिरमध्ये हिंसाचार वाढला
२०१४ मध्ये हिंसाचाराचे प्रमाण वाढलेले आहे. २०१४ मध्ये ३२ सामान्य माणसे, ५१ भारतीय सैन्याचे सैनिक आणि ११० दहशतवादी मिळून १९३ जण हिंसाचारामध्ये मारले गेले. २०१२ आणि २०१३ च्या तुलनेमध्ये यावर्षी हिंसाचारामध्ये खूपच वाढ झालेली आहे. याशिवाय पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करण्याचे प्रमाण ङ्गार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सरकारी आकड्यांनुसार २०१४ मध्ये १४० हून अधिक वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. साठ नवीन दहशतवादी काश्मिर मध्ये घुसले असावेत असा गुप्तचर संस्थांचा अंदाज आहे. पण २०१३ च्या तुलनत यंदा अधिक घुसखोरांना सीमेवर आणि ताबारेषेवरच मारण्यामध्ये सैन्याला यश आलेले आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवरील गोळीबाराचे वाढते प्रमाण
मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान सैन्याने ताबारेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर उखळी तोङ्गांनी गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहे. त्यातही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर होणार्‍या गोळीबाराचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये अनेक जण मारले गेलेले आहेत. सीमेपासून पाच किलोमीटरच्या आत राहाणार्‍या सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे खूपच नुकसान झालेले आहे. याशिवाय शेकडो सामान्य नागरिक यामध्ये जखमी झालेले आहेत. आता सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने जवळजवळ सगळ्या पाच किलोमीटर हद्दीमधील नागरिकांना सुरक्षित जागी हलवलेले आहे. मात्र यामुळे त्यांना आपल्या ़क्षेत्रामध्ये काम करता येणार नाही. परिणामी, त्यांचे आर्थिक नुकसान झालेलेे आहे. तसेच यापुढील काळातही काही ना काही कुरापती काढून पाकिस्तानकडून सिमेवर राहणार्‍या नागरिकांवर उखळी तोङ्गांचा गोळीबार होतच राहणार आहे. हे लक्षात घेता त्यांच्या घरांजवळ बंकर बनवण्याची गरज आहे. जेणे करून गोळीबार सुरू झाल्यास हे नागरिक या बंकर्समध्य राहू शकतील.
काश्मीरमध्ये शस्त्रधारी दहशतवादी
गुप्तचर खात्याच्या अंदाजानुसार सध्या काश्मीरमध्ये २५० ते ३०० शस्त्रधारी दहशतवादी कार्यरत आहेत. याशिवाय त्यांना ङ्गुटिरतावादी संघटनांकडून प्रचंड प्रमाणात मदत मिळते. काश्मीर खोर्‍यामध्ये तेथिल युवकांनी अनेकदा इसिसचे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ङ्गेसबुकवर आणि सोशल मीडियावर अनेक शिकलेले काश्मिरी युवक इसिसशी संबंध ठेवून असल्याचे आढळून आले आहे. सोशल मीडियावरून होणार्‍या या प्रचारावर आपल्याला लक्ष ठेवण्याची गरज आहे. ङ्गेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटस तसेच विविध प्रकारचे ब्लॉग्ज यांवर नजर ठेवून आक्षेपार्ह साईटस् ब्लॉक करण्याची गरज आहे. त्यामुळे तरुणांची माथी भडकावण्यासाठी केला जाणारा विखारी प्रचार थांबवण्यात आपल्याला यश मिळू शकेल. काश्मिरमध्ये ङ्गुटिरतावादी आणि देशद्रोही विचारांची अनेक वृत्तपत्रे आजही आहेत. अशा वृत्तपत्रांवरही आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे.
सुदैवाची बाब म्हणजे, आज अनेक शिकलेले काश्मिरी युवक पुणे, मुंबई, बंगळुरु अशा ठिकाणी नोकर्‍या करत आहेत. याशिवाय हिवाळ्याच्या काळात म्हणजे साधारणपणे ऑक्टोबरपासून मार्चपर्यंत अनेक अप्रशिक्षित काश्मिरी नागरिकही बाहेर जाऊन इतर ठिकाणी मजुरीची कामे करतात. त्यामुळे त्यांचा इतर भारतीयांशी संपर्क वाढतो. परंतु, काश्मीरमध्ये विकासाची कामे वाढवून तेथील शिक्षित आणि अशिक्षत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता आल्या तर ङ्गुटिरतावाद्यांकडे आकर्षित होणार्‍या युवकांची संख्या कमी होण्यास मदत होईल. काश्मिरमध्ये रस्ते आणि रेल्वेलाईन बांधण्याचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे. तेथे विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या गेल्या तर तेथे अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळेल आणि त्यामुळे दहशतवाद नक्कीच कमी होईल. केंद्र सरकारकडून काश्मिरला प्रचंड प्रमाणात आर्थिक मदत दिली जाते. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काश्मीरला इतर भारतीय राज्यांच्या तुलनेमध्ये १७ पटीने जास्त आर्थिक मदत दिली जाते. पण दुर्दैवाने ७० ते ९५ टक्के पैसा हा भ्रष्टाचारामध्ये हडप केले जातात. त्यामुळेच आगामी काळात तेथे भ्रष्टचारमुक्त व स्वच्छ अशा राज्यकारभाराची गरज आहे.
आगामी काळातील काश्मीरमधील स्थिती
चालू वर्षाखेरपर्यंत अङ्गगाणिस्तानमधून अमेरिकेच्या आणि नाटोच्या ङ्गौजा परत जाणार आहेत. त्यामुळे तेथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर तालिबान्यांच्या बळावर पाकिस्तान, अल् कायदा आणि पाकिस्तानातील इतर अतिरेकी संघटनांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. या संघटनांचे दहशतवादी भारतामध्ये आणि खास करून काश्मीरमध्ये येण्याची आणि तेथे मोठा हिंसाचार घडवून आणण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आपल्याला अङ्गगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये होणार्‍या घटनांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. काश्मिरमध्ये अशा प्रकारच्या जागतिक दहशतवादी संघटनांचा धोका वाढू नये यासाठी आपल्या सैन्याचा आणि सीमा सुरक्षा दलाचा वापर करून आपल्याला सीमांचे संरक्षण अधिक सजगपणाने करावे लागणार आहे. तसेच देशात घुसलेल्या अतिरेक्यांविरुद्ध वेगवान कारवाया करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
तालिबान, अल् कायदा आणि इसिसचा वाढता धोका लक्षात घेऊन आपली अंतर्गत सुरक्षा भक्कम करण्यासाठी भक्कम उपाययोजना केल्या गेल्या तर हे आव्हान आपण योग्य प्रकारे पेलू शकतो. त्यासाठी काश्मीरमध्ये स्थिर सरकार सत्तेवर येणे आणि तेथे विकासात्मक व भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण होऊन आर्थिक विकासाला चालना मिळणे आवश्यक आहे.