दिल्लीतील शाळेवर हल्ला

0
71

दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरातील एका ख्रिश्‍चन शाळेवर काल सकाळी हल्ला झाला. हल्लेखोरांनी शाळेची सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा नष्ट केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घुसून नासधूस केली. हल्ल्याचे कारण समजलेले नाही. दिल्लीतील ख्रिश्‍चन संस्थांवर हल्ले होण्याची या वर्षातील ही सहावी वेळ आहे. वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्झिलियम या संस्थेवर हल्ला झाल्याचा वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला. हल्लेखोर बुरखा घालून आले होते. मुख्याध्यापकांच्या कार्यालयातील आठ हजार रुपयांची रक्कमही गायब झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या वरील संस्थेच्या माजी विद्यार्थिनी असून या घटनेची त्यांनी दखल घेतली आहे.