‘आयव्हरमेक्टिन’बाबत जनतेची आरोग्यमंत्री राणेंकडून दिशाभूल

0
120

>> गिरीश चोडणकर यांचा आरोप

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने कोविड आजारावर आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्यास परवानगी दिल्याचे भासवून आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी गोमंतकीय जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने कोविड आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून योग्य आरोग्य चाचणी न करता सदर गोळ्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे का हे राणे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.

आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या वापराबद्दल कुठल्या तज्ज्ञांनी सल्ला दिला होता हे विश्‍वजीत राणे यांनी सांगावे अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली. गोव्यातील सवर्ल आरोग्य केंद्रांतील आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा साठा अचानक गायब झाल्याचे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.

कोविड रुग्णांना देण्यात येणारे ऑक्सिमीटर हे दर्जाहीन असून त्यापैकी बरेच चालत नसल्याचेही आम्ही राणे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चोडणकर यांनी म्हटले आहे.