काणकोणात भाजपला दहा पैकी दहा

0
63

>> सर्वानुमते नगराध्यक्ष ठरविणार ः इजिदोर

काणकोण नगरपालिकेच्या १२ ही प्रभागांतून निवडून आलेले उमेदवार हे भाजपाप्रणित असल्याचा दावा करताना या नगरसेवकांमध्ये अजिबात मतभेद नसून सर्वानुमते नगराध्यक्षाची निवड केली जाईल असे काणकोणचे आमदार तथा उपसभापती इजिदोर फर्नाडिस यांनी सांगितले. या निवडणुकीत उतरलेल्या ३१ उमेदवारांपैकी काही जण भाजपाचे कार्यकर्ते तर काहीजण समर्थक होते, त्यामुळे भाजपाचा नेमका गट यावेळी जाहीर करण्यात आला नव्हता. निकाल जाहीर झाल्यानंतर श्र्‌री. फर्नांडिस यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. मात्र, भाजपाचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत यांची अनुपस्थिती खूप काही सांगून गेली.