काणकोणात आज नवोदय प्रवेश परीक्षा

0
14

केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची आज प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. दक्षिण गोव्यातील एकमेव विद्यालय असलेल्या या विद्यालयात इ. 6 वीच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. बारावी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयातून देण्यात येते. इयत्ता पाचवीत शिकणारे या तालुक्यातील एकूण 124 विद्यार्थी या परीक्षेला बसणार असल्याची माहिती काणकोणचे भाग शिक्षणाधिकारी लॉरेन्स परेरा यांनी दिली. विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे,