कळसा प्रकल्पाची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करा

0
245

>> गोव्याच्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

म्हादई प्रश्नी कर्नाटकला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले असून कळसा भांडुरा प्रकल्पाची गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या संबंधित अधीक्षक अभियंत्यांनी संयुक्त पाहणी करून चार आठवड्यांत अहवाल द्यावा असे निर्देश दिले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली.

गोवा सरकारने कर्नाटकविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती शहा यांनी हा निवाडा काल दिला.

म्हादई जललवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न जुमानता म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या कृतीच्या विरोधात गोवा सरकारतर्फे गेल्या वर्षी चार ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात जी अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे, तिच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश काल दिले. न्यायालयाच्या या निवाड्यामुळे कर्नाटकला मोठी फटकार बसली असली आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे अधिकार्‍यांच्या संयुक्त पाहणीत हे बिंग फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.