Home बातम्या कलम 39 अ’ रद्द करण्यासाठीवीरेश बोरकरांचा खासगी प्रस्ताव

कलम 39 अ’ रद्द करण्यासाठीवीरेश बोरकरांचा खासगी प्रस्ताव

0

आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी चार खासगी प्रस्ताव सादर केले आहेत. या खासगी प्रस्तावामध्ये टीसीपी कलम 39अ रद्द करणे, जमीन संरक्षण विधेयक, भाडेपट्टा कायद्यातील सुधारणा आणि मेगा प्रकल्पांची व्याख्या स्पष्ट करणे या खासगी प्रस्तावांचा समावेश आहे, अशी माहिती आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गोव्यातील जमिनींचे रक्षण करण्यासाठी टीसीपी कायद्याच्या कलम 39 अ बद्दल जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. वीरेश बोरकर यांनी टीसीपीच्या कलम 39 अ च्या विरोधात लढा सुरू करून नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या लढ्यात व्यापक जनसहभाग आवश्यक आहे. तसेच, टीसीपी कलम 39 अ बाबत जागरूकता करण्याची गरज आहे, असेही मनोज परब म्हणाले.