Home बातम्या कर्जासाठी आयएमएफने घातल्या पाकिस्तानला अकरा नव्या अटी

कर्जासाठी आयएमएफने घातल्या पाकिस्तानला अकरा नव्या अटी

0

पाकिस्तानने काही दिवसांपूर्वीच इंटनॅशनल मॉनेटरी फंड (आयएमएफ) कडून एक बिलियन डॉलरचे कर्ज घेतले आहे. मात्र आता आयएमएफला पाकिस्तान आपले पैसे बुडवणार तर नाही ना? अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आता आयएमएफने मोठे पाऊल उचलताना पाकिस्तानला कर्जाचा पुढचा हाफ्ता देण्यापूर्वी 11 नव्या अटी घातल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेला तणाव यामुळे पाकिस्तानला कर्ज देण्यामध्ये जोखीम आणखी वाढली आहे, असेही यावेळी आयएमएफने म्हटलं आहे.

काय आहेत त्या अटी?
आयएमएफने पाकिस्तानला 11 अटी घातल्या आहेत. त्यामध्ये पुढच्या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला 17,600 अब्ज रुपयांच्या नव्या बजेटला मान्यता देणे अनिर्वाय राहील. वीज उत्पादन, आणि वीज उत्पादनातून मिळणारे उत्पन्न यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.
तीन वर्षांपेक्षा जुन्या वापरलेल्या गाड्यांच्या आयातीवरील बंदी उठवावी लागणार. नवीन कृषी उत्पन्न कायद्याची अंमलबजावणी, ज्यामुळे करदात्याची ओळख पटेल, रिर्टन प्रक्रिया सुधारेल. देशामध्ये संचार प्रणाली अधिक मजबूत करावी लागेल. आयएमएफने ऑपरेशनलशी संबंधित केलेल्या शिफारशी आधिक गांभीर्याने घ्याव्या लागतील. 2027 नंतरची आर्थिक रणनीतीदेखील आतापासूनच तयार करावी लागेल. ऊर्जा क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी कार्यक्रम राबवावे लागतील. यासह आणखी काही अटी पाकिस्तानला घालण्यात आल्या आहेत, तसेच पाकिस्तानला आयएमएफचे हे कर्ज पुढील तीन वर्षांमध्ये फेडावे लागणार आहे.
पाकिस्तानने केवळ आयएमएफकडूनच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय बँकांकडूनदेखील कर्ज घेतले असून ते पुढील तीन वर्षांमध्ये फेडायचे आहे.