Home बातम्या कमलाकांत तारी यांना मयेरत्न पुरस्कार जाहीर

कमलाकांत तारी यांना मयेरत्न पुरस्कार जाहीर

0

गोसेवक व सामाजिक कार्यकर्ते कमलाकांत तारी यांना मयेरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मये येथे 24 व 25 रोजी होणाऱ्या मये महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आयोजन समितीचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर यांनी ही माहिती दिली. सरकारी सेवेतून निवृत्त होताच साडेपाच हजार गोधन असलेली गोशाळा सांभाळत गोसेवेचे व्रत स्वीकारून सेवा करणारे कमलाकांत तारी यांची मयेरत्न पुरस्कारसाठी निवड करताना आनंद होत असल्याचे ठाणेकर यांनी सांगितले.