कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन३० नोव्हेंबरपर्यंत कायम

0
273

>> केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कंटन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत कायम राहील असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. गृहमंत्रालयाने काल मंगळवारी पुढील काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घ्यायची आणि कोणत्या गोष्टींमध्ये सूट असेल याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यानुसार ३० सप्टेंबरला जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. अनेक गोष्टींना केंद्र सरकारने नियम आणि अटींसह संमती दिली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये लॉकडाऊन कायम असेल असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.