औद्योगिक विकास दुरुस्ती विधेयक घेतले मागे

0
9

राज्य विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोवा औद्योगिक विकास (दुरुस्ती) विधेयकाला विरोध करून सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्याची मागणी केल्याने अखेर उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांना विधेयक काल मागे घ्यावे लागले. सदर विधेयकातील त्रुटी दूर करून पुन्हा सादर केले जाणार आहे, असे गुदिन्हो यांनी सांगितले.