‘एसटीं’च्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटणार

0
9

>> राजकीय आरक्षणाविषयी शनिवारी विधानसभेत होणार घोषणा

>> मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाअंती एसटी संघटनेचे आंदोलन मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (दि. 6) राज्यात आगमन होत असून, ते या दौऱ्यात बेतुल येथे आयोजित भारत ऊर्जा सप्ताह 2024 परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत जागतिक इंधन आणि वायू क्षेत्रातील तज्ज्ञ व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. याशिवाय मडगाव शहरात पंतप्रधानांची एक जाहीर सभा होणार असून, ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047′ अंतर्गत ते जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते 1330 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. तसेच यावेळी त्यांच्या हस्ते कुंकळ्ळी येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थे (एनआयटी, गोवा) च्या सुसज्ज संकुलाचे उद्घाटन करतील.

पंतप्रधानांच्या गोवा दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम निश्चित झालेला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी 10.30 वाजता ते ओएनजीसी सर्व्हायव्हल सेंटरचे उद्घाटन करतील. यानंतर 10.45 वाजता ते भारत ऊर्जा सप्ताह 2024 परिषदेचे उद्घाटन करतील. दुपारी 2.45 वाजता मडगावातील ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047′ ह्या सभेत ते सहभागी होतील. राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेच्या नवीन सुविधांचेही ते लोकार्पण करतील. ही संस्था जलक्रीडा आणि पाण्यातून बचाव करण्याच्या उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील 100 टीपीडी एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधेचेही ते उद्घाटन करतील.
पणजी आणि रेईश मागूश किल्ला यांना जोडणाऱ्या पर्यटन प्रवासी रोपवेची पायाभरणी पंतप्रधान करतील. दक्षिण गोव्यातील 100 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचीही ते पायाभरणी करणार आहेत.