एसआयटीला माहिती देण्यास जॉन फर्नांडिस तयार

0
118

राणे पिता-पुत्र प्रकरण
खनिज परवाना खंडणी प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर असलेल्या आरोप प्रकरणी विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) आपल्याला बोलावल्यास आपण संपूर्ण माहिती असलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तयार असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी सांगितले.
एसआयटीने फर्नांडिस यांना बोलावल्यास या प्रकरणाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता आहे.
दहेज मिनरलचे भालचंद्र नाईक यांनी कॉंग्रेस भवनमध्येच पत्रकार परिषदेवेळी येऊन केलेल्या वरील आरोपांमुळे राणे अडचणीत आले आहेत.
सध्या त्यांच्या अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी दि. १ ऑगस्ट रोजी निश्‍चित केली आहे. न्यायालय या प्रकरणात कोणती भूमिका घेईल यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे.