Home बातम्या एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदाची शपथ

एलिना साल्ढाना यांना मंत्रिपदाची शपथ

0

दरम्यान, मंत्री साल्ढाना यांना सोमवारी खाती देणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. साल्ढाना यांना कोणते खाते हवे, तसेच याबाबतीत त्यांची आवड लक्षात घेतल्यानंतरच खाते दिले जाईल, असे ते म्हणाले. शपथविधी सोहळ्यास मंत्री व आमदार उपस्थित होते. कॉंग्रेसचा एकही आमदार दिसला नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युतीला बहुमत मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात एलिनाचे पती माथानी साल्ढाना यांचा समावेश झाला होता. त्यांना पर्रीकर यांनी पर्यटनमंत्री केले होते. परंतु अवघ्या काळातच माथानी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यामुळे कुठ्ठाळी मतदारसंघ रिक्त झाला होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. ४ जून रोजी या मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर करून प्रक्रिया सुरू केली होती. परंतु भाजपने एलिना साल्ढाना यांची पक्षाच्या उमेदवार म्हणून अर्ज निवड केल्यानंतर एलिनाने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून रेमंड डिसा व युगोडेपाचे उमेदवार म्हणून रमाकांत बोरकर यांनी अर्ज भरले होते. परंतु राजकीय घडामोडीत या दोघांनीही अर्ज मागे घेतल्याने एलिना यांनी आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सुरुवातीपासूनच एलिना यांची मंत्रिपदी नियुक्ती करण्याचे आश्‍वासन दिले होते. काल त्याची पूर्तता करण्यात आली. साल्ढाना यांनी कोंकणीतून शपथ घेतली.