एमपीटीच्या प्रकल्पांना कार्लुस आल्मेदांचा विरोध

0
71

एमपीटीच्या नियोजित प्रकल्पांना आपला पूर्ण विरोध असून लोकांच्या इच्छेविरोधात नको असलेले प्रकल्प जनतेवर लादू नये. तसे झाल्यास सदैव लोकांबरोबर राहून सदर प्रकल्पांना विरोध करणार असल्याचा सज्जड इशारा वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी जनसुनावणीवेळी दिला. अदानी, जिंदाल, वेदांत व एमपीटी या कंपन्यांच्या होऊ घातलेल्या प्रकल्पांची जनसुनावणी काल पाचव्या दिवशी शांततेत झाली. आजही ती सुरू राहणार आहे. कालची सुनावणी संयुक्त जिल्हाधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी वक्त्यांना वेळेचे बंधन न घातल्याने कोणताही गदारोळ माजला नाही. आमदार आल्मेदा, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक आदींनी कोळसा प्रकल्प व इतर प्रकल्पांना विरोध केला.