एफडीएची मासळी, भाज्या, फळांसह अन्य खाद्यपदार्थांवर करडी नजर

0
168

>> आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एङ्गडीए) बाजारातील भाजी, ङ्गळे, मांस, मासे, स्वीट मार्टमधील खाद्यपदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांच्या तपासणीवर भर दिला जात आहे. सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे, अशी ग्वाही आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विधानसभेत काल दिली. आमदार लुईझिन ङ्गालेरो यांच्या खासगी ठरावाला उत्तर देताना आरोग्यमंत्री राणे यांनी ही माहिती दिली.
एङ्गडीएने नागरिकांना चांगली ङ्गळे, भाजी, मासे, मांस, खाद्यपदार्थ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बाजारातील वस्तूंची तपासणी केली जात आहे.
ङ्गळे, भाजी व इतर वस्तू ताज्या ठेवण्यासाठी रसायनांचा वापर केला जात असल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे एङ्गडीए सतर्क झाली आहे. आत्तापर्यंत मासळीचे १६२ नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. परंतु, त्यात कोणतेही घातक रसायन सापडलेले नाही. मासळीच्या तपासणीसाठी खास यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रसायनयुक्त आंबे ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आले आहेत. मडगाव येथे केळी पिकविण्यासाठी रसायनाचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर केळ्यांची तपासणी सुध्दा करण्यात आली आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

एङ्गडीए अधिक सक्षम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एफडीएच्या कामकाजात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप अयोग्य आहे. ही स्वायत्त संस्था असून त्यांना त्यांचे काम करण्याची मोकळीक दिली पाहिजे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. मार्केटमधील ङ्गळे, भाजी, मासे व इतर खाद्यपदार्थांमध्ये रसायनांचा वापर केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो. त्यामुळे बाजारातील खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी आवश्यक यंत्रणा तयार करावी, असा खासगी ठराव आमदार ङ्गालेरो यांनी सादर केला होता.
यावेळी चर्चेत भाग घेताना आमदार नीलेश काब्राल, उपसभापती मायकल लोबो आणि आमदार ग्लेन टिकलो यांनी महत्त्वपूर्ण सूचना करताना खाद्यपदार्थ नियमित तपासण्याची मागणी केली.