‘एनआयए’च्या कार्यालयाबाहेर स्फोट

0
108

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या येथील सॉल्ट लेक परिसरातील कार्यालयाबाहेर काल संध्याकाळी स्फोट झाला. बर्धमान येथील स्फोटाच्या चौकशीसाठी एनआयएचे हे हंगामी कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. काल संध्याकाळी पेट्रोल बॉम्बद्वारे घडवलेल्या या स्फोटामुळे तपास यंत्रणेचे कार्यालय असलेल्या केंद्रीय राखीव दलाच्या कुंपणांना तडे गेले. दरम्यान, स्फोटासंबंधी तपास करताना पश्‍चिम बंगाल व एनआयए यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी)च्या दोन कमांडरना पकडले आहे. शनिवारी साजिद याला पकडला होता. अमजद शेख हा शनिवारी हाती लागला.