सोनाली फोगट खून प्रकरणी कर्लिस क्लबच्या एडविन नुनीस याला काल अखेर जामीन मंजूर करण्यात आला. म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुनीस याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या वैयक्तिक हमी आणि प्रत्येकी १५ हजारांचे दोन जामीन या अटीवर नुनीस याला जामीन मंजूर केला; मात्र त्याला काही अटी घालण्यात आल्या आहेत.
नुनीसला कर्लिस क्लबमध्ये जाण्यास बंदी असेल. गोव्याबाहेर जायचे असल्यास आधी पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. न्यायालय व पोलिसांनी आदेश दिल्यास नुनीसला तपास अधिकार्यांसमोर हजेरी लावावी लागेल, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.