चाळीस वर्षांपूर्वी ‘पद्मश्री’ किताब दिलेल्यालाच पुन्हा यंदा ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्याचा अजब प्रकार ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राने उघडकीस आणला आहे. नेहरूंच्या काळातील एक जुनेजाणते छायाचित्रकार सुनील जनाह यांना यंदा ‘पद्मश्री’ जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले गेलेले आहेच. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना ‘पद्मश्री’ किताब देण्यात आला होता. तेव्हा त्यांच्या आडनावाचे स्पेलिंग ‘जनथ’ असे केले गेले होते व त्यांचे वास्तव्याचे ठिकाण दिल्ली दाखवले गेले होते. मात्र ते मूळचे आसामचे आहेत, अशी माहितीही या संदर्भातील बातमीत देण्यात आली आहे.
त्यांना पुन्हा पद्मश्री जाहीर होताच त्यांचे कुटुंबीयही अचंबित झाले. सरकार पद्म किताब देऊन मोकळे होते आणि मग मात्र सरकारला त्यांचा विसर पडतो याचे हे उत्तम उदाहरण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.