एकता बिश्त ‘आयसीसी’ संघात

0
109

भारताची डावखुरी फिरकीपटू एकता बिश्त हिला यंदाच्या आयसीसी वनडे तसेच टी-२० संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही संघात स्थान मिळालेली ती भारताची एकमेव खेळाडू आहे. टीम इंडियाची कर्णधार मिताली हिला मात्र केवळ वनडे तर हरमनप्रीत कौरला टी-२० संघात जागा मिळाली आहे.

३१ वर्षीय बिश्त वनडे क्रमवारीत १४व्या तर टी-२०मध्ये १२व्या स्थानी आहे. २१ सप्टेंबर २०१६ पासून तिने १९ एकदिवसीय सामन्यांत ३४ तर ७ टी-२०मध्ये ११ बळी घेतले आहेत. विश्‍वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाची कर्णधार हिथर नाईट हिच्याकडे वनडे संघाचे तर वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलरकडे टी-२० संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

आयसीसी वनडे टीम ऑफ ईयर ः टॅमी ब्युमॉंट (इंग्लंड), मेग लेनिंग (ऑस्ट्रेलिया), मिताली राज (भारत), ऍमी सॅथरवेट (न्यूझीलंड), एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), हिथर नाईट (इंग्लंड), साराह टेलर (इंग्लंड), डेन व्हेन निएकर्क (द. आफ्रिका), मरिझान काप (द. आफ्रिका), एकता बिश्त (भारत) व आलेक्स हार्टले (इंग्लंड).
आयसीसी टी-२० टीम ऑफ ईयर ः बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया), डॅना वाइट (इंग्लंड), हरमनप्रीत कौर (भारत), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), सोफी डिव्हाईन (न्यूझीलंड), डिअँड्रा डॉटिन (वेस्ट इंडीज), हेले मॅथ्यूज (वेस्ट इंडीज), मेगन शूट (ऑस्ट्रेलिया), अमांडा-जेड वेलिंग्टन (ऑस्ट्रेलिया), लिया ताहुहू (न्यूझीलंड) व एकता बिश्त (भारत)