Home बातम्या उरुग्वे गटात अव्वल

उरुग्वे गटात अव्वल

0
उरुग्वे गटात अव्वल
Uruguay's forward Edinson Cavani (C-L) celebrates with Uruguay's defender Diego Godin (C-R), Uruguay's midfielder Matias Vecino and Uruguay's midfielder Cristian Rodriguez (R) after scoring a goal during the Russia 2018 World Cup Group A football match between Uruguay and Russia at the Samara Arena in Samara on June 25, 2018. / AFP PHOTO / Fabrice COFFRINI / RESTRICTED TO EDITORIAL USE - NO MOBILE PUSH ALERTS/DOWNLOADS

>> यजमान रशियाचा ३-० असा फडशा

उरुग्वेने यजमान रशियाचा ३-० असा फडशा उडवून फिफा विश्‍वचषक स्पर्धेच्या ‘ए’ गटामध्ये अव्वल स्थान मिळवले. विश्‍वचषक स्पर्धेत गटात अव्वल राहण्याची उरुग्वेची ही पाचवी वेळ आहे. १९३०, १९५०, १९५४ व २०१० साली ते गटात अव्वल राहिले होते.

समारा एरिनामध्ये काल सोमवारी झालेल्या या सामन्यात लुई सुआरेझने सामन्याच्या दहाव्या मिनिटाला फ्री-किक मिळाली आणि या संधीचे त्याने गोलमध्ये रुपांतर करत उरुग्वेचे खाते उघडले. रशियाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात दिमाखदार कामगिरी करणार्‍या डॅनिस चेरेशेव्हने २३ व्या मिनिटाला स्वयंगोल केल्याने उरुग्वेची आघाडी २-० अशी वाढली. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला रशियाच्या स्मोलनिकोव्हला रेड कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे जवळपास तासभर रशियाला १० खेळाडूंसहच खेळावे लागले. पूर्वार्धात उरुग्वेने २-० अशी आघाडी कायम राखली. रशियाच्या आर्टेम झुबा याने दुसर्‍या सत्रात गोल करण्याची सुवर्णसंधी दवडली. दुसर्‍या रशिया अधिक आक्रमक होईल, असे वाटत होते. पण उरुग्वेने त्यांचे आक्रमण उत्तमरीत्या थोपवले.

९०व्या मिनिटाला एडिनसन कवानीने गोल झळकावून उरुग्वेच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे साखळी फेरीतल्या उरुग्वेविरुद्ध एकाही प्रतिस्पर्ध्याला गोल डागता आला नाही. म्हणजेच उरुग्वेच्या बचावफळीने साखळीत दमदार कामगिरी बचावली. अशी कामगिरी करणारा उरुग्वे हा १९९८ नंतरचा पहिलाच संघ ठरला. आता बाद फेरीत उरुग्वेसमोर पोर्तुगाल किंवा स्पेनचे कडवे आव्हान असू शकते.