उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली तपासकाम

0
104

मांगूरहील वास्को येथील दुहेरी खून प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी वास्को येथील पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले असून लवकरच आरोपीना अटक होऊ शकेल, असे पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी सांगितले. गुन्हा अन्वेषण पोलिसही चौकशीच्या कामी त्यांना मदत करतील, असे त्यांनी सांगितले.