उद्यापासून गोव्यात पुन्हा जोरदार पाऊस शक्य

0
112

राज्यात जून महिन्यात ३०.९७ इंच मोसमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण १६ टक्के कमी आहे. राज्यात मोसमी पावसाने तूर्त विश्रांती घेतली असून ३ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरू होण्याची शक्यता पणजी हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा मोसमी पावसाचे १४ दिवसाच्या उशिराने आगमन झाले. पावसाचे आगमन झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे सरासरी पावसाच्या तुटीचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चार दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे सरासरी पावसाची तूट १६ टक्क्यांवर आली आहे. राज्यात आत्तापर्यंत दाबोली येथे सर्वाधिक ३५.७४ इंच आणि म्हापसा येथे सर्वांत कमी २०.२३ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात मागील चार दिवस जोरदार पडलेल्या पावसाने विश्रांती घेतली आहे.