Home बातम्या उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळविस्तार, 6 नवीन सदस्य

उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळविस्तार, 6 नवीन सदस्य

0

उत्तर प्रदेशामध्ये योगी मंत्रिमंडळाचा काल दुसऱ्यांदा विस्तार झाला. 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 6 नवीन सदस्य सामील झाले. तर 2 राज्यमंत्र्यांना पदोन्नती देऊन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. राजभवनात रविवारी आयोजित समारंभात सर्वात आधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. त्यानंतर सपाचे बंडखोर आमदार मनोज पांडे यांनी शपथ घेतली. दोघांनाही कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले आहे. तिसऱ्या क्रमांकावर अजित पाल आणि त्यानंतर सोमेंद्र तोमर यांनी शपथ घेतली. दोघांनाही पदोन्नती देऊन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. त्यानंतर कृष्णा पासवान, कैलाश राजपूत, सुरेंद्र दिलेर आणि हंसराज विश्वकर्मा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. नवीन बनलेल्या मंत्र्यांमध्ये 1 ब्राह्मण, 3 ओबीसी आणि 2 दलित वर्गातील आहेत.