उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे एका कालव्यात वाहन कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघातग्रस्त वाहनात 15 प्रवासी होते. हे सर्व पृथ्वीनाथ मंदिरात दर्शनासाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांचे वाहन एका कालव्यात पडले यामुळे या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा येथील अपघाताची माहिती घेतली आहे. तसेच त्यांनी कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर योग्य वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी बचाव कार्य सुरू केले. चालकासह चारजणांना वाचवण्यात आले. पोलिसांनी 11 मृतदेह बाहेर काढले आहेत. जखमी चारजणांना रुग्णालयात पाठवून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.