Home बातम्या उत्तर कोरियाने डागलीजपानवर क्षेपणास्त्रे

उत्तर कोरियाने डागलीजपानवर क्षेपणास्त्रे

0

उत्तर कोरियाने काल रविवारी जपानवर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत तातडीचा अलर्ट जारी केला. जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइजुमी यांनी, उत्तर कोरियाने किमान दोन क्षेपणास्त्रे डागली आहेत. ही दोन्ही क्षेपणास्त्रे जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेर (एएन) पडली. जपानचे हे विशेष आर्थिक क्षेत्र त्याच्या किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे 370 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे आणि क्षेपणास्त्रे जपानच्या समुद्रात पडली असे म्हटले आहे. संरक्षण मंत्री कोइजुमी यांनी उत्तर कोरियाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपणासारख्या कृती आमच्या प्रदेशासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या शांतता व सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या क्षेपणास्त्रांनी सुमारे 950 किलोमीटरचे अंतर कापले.