उत्तराखंडच्या हलद्वानीत हिंसाचार

0
0

उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात मलिक बागेजवळ एका अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आणि या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. पोलीस बंदोबस्तात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला. त्यानंतर जमाव आणखी आक्रमक झाला. या जमावाने पोलीस, महापालिका आणि प्रसारमाध्यमांच्या गाड्या पेटवल्या. या घटनेत 4 हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे, तर तर 100 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.