ईशान्य पायदळ तुकडीतील जवानाचे कवायतींवेळी निधन

0
91

>>बंडाचा लष्कराकडून इन्कार

लष्कराच्या ईशान्य पायदळ विभागाच्या कवायतींदरम्यान काल एका जवानाचे निधन झाल्याने त्याचे सहकारी भावनिक बनल्यानंतर सदर ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. मात्र याप्रकरणी बंड झाल्याच्या वृत्ताचा लष्कराने इन्कार केला आहे. याबाबत वृत्त असे की कवयातींआधी सदर जवानाने छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. मात्र वैद्यकीय अधिकार्‍याने त्याची तपासणी करून तंदुरुस्त असल्याचे जाहीर केल्यानंतर सदर जवान कवायतींत सहभागी झाला. मात्र संचलन चालू असताना तो कोसळला व त्याचे निधन झाले. त्यामुळे त्याचे काही सहकारी भावनिक बनले. त्यामुळे घटनास्थळी झटापटीही झाल्या. या घटनेची चौकशी सुरू झाल्याचे सांगण्यात आले.