‘इस्लामिक स्टेट’ विरोधात अरब देश अमेरिकेच्या पाठिशी

0
86

सिरीया व इराकमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवादी संघटनेविरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाला अनेक अरब राष्ट्रांनी पाठिंबा दिल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले. मात्र नेमक्या कुठल्या देशांनी पाठिंबा दिला, हे सांगण्यास अमेरिकेने नकार दिला. इस्लामिक दहशतवाद्यांना उद्ध्वस्थ करण्याची घोषणा हल्लीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. सिरीया, इराकमध्ये हवाई हल्ले वाढविण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.