इस्त्रोची अवकाशात पुन्हा यशस्वी झेप

0
10

>> एकाचवेळी 36 उपग्रहांचे केले प्रक्षेपण

>> उपग्रहांचे एकूण वजन 5 हजार 805 टन

इस्त्रो या भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने काल पुन्हा एकदा आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवताना एकाचवेळी 36 उपग्रहांचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. इस्रोने काल रविवारी एएव्हीएम3-एम3 या रॉकेटचे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करताना त्याद्वारे एकाच वेळी 36 उपग्रह अवकाशामध्ये स्थापित करण्यात आले आहेत. काल सकाळी 9 वाजता हे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले.
43 मीटर उंची असणाऱ्या इस्रोच्या रॉकेटने 36 उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. एलव्हीएम3 या रॉकेटने ज्या उपग्रहांसह उड्डाण केले त्यांचे एकूण वजन 5 हजार 805 टन आहे. या मोहिमेला एएव्हीएम3-एम3 वन वेबइंडिया-2 असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली.

नेटवर्क ॲक्सेस असोसिएट्स लिमिटेड युनायटेड किंगडमने (वनवेब ग्रुप कंपनी) 72 उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या न्यूस्पेस इंडिया लिमिटेडसह एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. 23 ऑक्टोबर 2022 मध्ये इस्रोने वन वेब मोद्वारे 36 उपग्रह प्रक्षेपित केले. भारतातील भारती एंटरप्रायझेस जपशथशल मध्ये प्रमुख गुंतवणूकदार आणि भागधारक म्हणून काम करते. एलव्हीएम3 चे हे सहावे उड्डाण आहे. चांद्रयान-2 सह याने सलग पाच मोहिमा केल्या होत्या अशी माहिती इस्त्रोद्वारे देण्यात आली.