इलेक्ट्रिक वाहनांसाठीची अनुदान योजना होणार बंद

0
19

नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा खात्याची नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देणारी अनुदान योजना येत्या ३१ जुलैपासून बंद केली जाणार आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी ही अनुदान योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेखाली इलेक्ट्रिक २ व्हीलर, ३ व्हीलर आणि ४ व्हीलर वाहनांची खरेदी करण्याची मुभा होती. डिसेंबर २०२१ दिवशी किंवा नंतर आणि ३१ जुलै २०२२ दिवशी किंवा पूर्वी खरेदी केलेले इलेक्ट्रिक वाहन अनुदानासाठी पात्र ठरणार आहे, असे कळविण्यात आले आहे.