इंधनासाठीचे क्रेडिट कार्ड आणि उपयोग

0
22
  • – शशांक मो. गुळगुळे

इंधन कंपनीबरोबर ‘को-ब्रॅण्डेड’ कार्ड असेल त्या कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यास कार्डधारकाला सवलती मिळतात. या अशा प्रकारच्या बहुतेक कार्डवर कार्डधारकांना ‘रिवॉर्डस्’ दिले जातात. असे बरेच रिवॉर्डस् एकत्र केल्यावर कार्डधारकाला काही लिटर इंधन मोफत मिळू शकते.

वाहनात इंधन भरल्यानंतर पैसे रोख देण्याऐवजी क्रेडिट किंवा डेबिट कार्डने देता येतात. ‘क्यूआर कोड’ने, ‘गुगल-पे’ने तसेच ‘पेटीएम’ने पेट्रोल पंपावर पैसे भरण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. याशिवाय इंधनाचे पैसे भरण्यासाठी खास क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत/मिळतात. याना ‘फ्यूएल बेस्ड क्रेडिट कार्ड’ असे संबोधिले जाते.

क्रेडिट कार्ड कंपन्या मग त्या ‘रुपे’ असो, ‘व्हिसा’ असो किंवा अन्य कोणत्याही असतो- या कंपन्या इंधन उत्पादक कंपन्यांबरोबर- त्या म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा कंपन्यांबरोबर ‘को-ब्रॅण्डेड’ कार्ड कार्यरत करतात. ज्या इंधन कंपनीबरोबर ‘को-ब्रॅण्डेड’ कार्ड असेल त्या कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यास कार्डधारकाला सवलती/फायदे मिळतात. या अशा प्रकारच्या बहुतेक कार्डवर कार्डधारकांना ‘रिवॉर्डस्’ दिले जातात. प्रत्येक वेळेस पेट्रोल भरताना कार्डधारकाला रिवॉर्डस् मिळतात. असे बरेच रिवॉर्डस् एकत्र केल्यावर कार्डधारकाला काही लिटर इंधन मोफत मिळू शकते. उदाहरणच द्यायचे तर, सिटी इंडियन ऑईल क्रेडिट कार्डवर जर इंधन इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपवर भरले तर १५० रुपयांच्या इंधन खरेदीवर चार टर्बो पॉईंट्‌स मिळतात. एक टर्बो पॉईंट म्हणजे १ रुपया. एका टर्बो पॉईंटचे मूल्य एक रुपया. म्हणजे तुम्ही १० हजार रुपयांचे इंधन भरले तर तुम्हाला २६७ टर्बो पॉईंट मिळणार. या २६७ टर्बो पॉईंटवर तुम्हाला इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपवर २६७ रुपयांचे पेट्रोल मोफत मिळणार. म्हणजे साडेसदतीस रुपयांच्या पेट्रोल खरेदीवर एक रुपयाचे पेट्रोल/इंधन मोफत मिळणार. याशिवाय या कार्डने तुम्ही स्वयंपाकासाठी लागणारे पदार्थ खरेदी केलेत, तसेच सुपर मार्केटमध्ये खरेदी केली तर वेगळे पॉईंट्‌स मिळणार.

वर्षाला जर तुमची कार साधारणपणे पंधरा हजार किलोमीटर धावत असेल. एक लिटर पेट्रोलवर साधारणपणे १० किलोमीटर कार धावत असेल, तर अशा ग्राहकाला १५०० लिटर पेट्रोल लागणार. सध्याचा पेट्रोलचा दर विचारात घेता १५०० लिटर पेट्रोलसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च येणार. अशा कार्डधारकाला चार हजार रुपयांचे पेट्रोल फुकट मिळू शकते. ज्या वाहनधारकाचा पेट्रोल खर्च महिन्याला १२ हजार रुपयांहून अधिक आहे, अशाला एका वर्षाला ४० लिटरपर्यंत पेट्रोल मोफत मिळू शकते, हा इंधनासाठीचे कार्ड घेण्याचा फायदा आहे. याशिवायही कार्डधारकांसाठी अन्य काही फायदे/सवलती उपलब्ध आहेत.
जे वाहनाचा सतत वापर करतात किंवा स्वतःच्या वाहनानेच प्रवास करतात अशांनी इंधनासाठीचे के्रडिट कार्ड घ्यायलाच हवे/वापरायलाच हवे. तसेच ज्या इंधन कंपनीचे को-ब्रॅण्डेड कार्ड आहे त्या कंपनीच्या पेट्रोल पंपावरच पेट्रोल भरावयास हवे. याशिवाय या कार्डधारकांना ‘वेलकम बोनस’ व ‘माईल स्टोन बोनस’ही मिळतो. इंधनावर जो ‘सरचार्ज’ आकारला जातो, तो ‘सरचार्ज’ही कार्डधारकांना भरावा लागत नाही/न भरण्याची सवलत मिळते.

काही कार्डांच्या बाबतीत महिन्याला किती सवलत दिली जाणार याची कमाल मर्यादा ठरवितात. त्या मर्यादेपर्यंतच सवलती मिळू शकतात. हे रिवॉर्ड पेट्रोल पंपावरच वापरले पाहिजेत असे नसते; अन्यत्रही कपड्याच्या दुकानात किंवा डिपार्टमेन्ट स्टोअर्समध्येही या रिवॉर्डस्‌च्या सवलती घेता येऊ शकतात.
या कार्डासाठी भरावयाचे शुल्क फार कमी असते. तसेच जर एका ठरावीक मर्यादेपर्यंत खरेदी केली तर नूतनीकरणाच्या वेळी भरावयाच्या शुल्कात सवलत मिळू शकते. नवीन कार्ड देताना बहुधा शुल्क आकारले जात नाही. नूतनीकरणाच्या वेळी शुल्क आकारले जाते. सध्या कार असणे ही लोकांची गरज झाली आहे. तसेच या वाहनधारकांकडे इंधनासाठीचे कार्ड असणेही गरज निर्माण व्हावयास हवी.

इंधनासाठीच्या कार्डांवर इंधन खरेदीवरच रिवॉर्ड मिळतात. हे कार्ड वापरून अन्यत्र खरेदी केली तर रिवॉर्ड मिळत नाहीत. ज्यांची पेट्रोल खरेदी नियमित आहे किंवा जास्त आहे अशा ग्राहकांनी इंधनासाठीचे कार्ड घ्यावे. कोणीही कितीही कार्ड घेऊ शकतो. कार्ड बाळगण्यासाठी काही मर्यादा नाहीत. त्यामुळे इंधनासाठीचे एक व इतर खरेदीसाठीचे एक अशी दोन कार्डस् बाळगावी. कधीतरी कार वापरणारे व जास्त वेळा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणार्‍यांनी इंधन वापरासाठीचे कार्ड प्रमुख कार्य म्हणून वापरू नये. या रिवॉर्डचा फायदा सर्व पेट्रोल पंपवर मिळत नाही. ज्या पेट्रोल पंपवर मिळतो त्याची यादी तुम्हाला माहीत हवी. जर ते पेट्रोल पंप तुमच्या रस्त्यात नसतील तर तुम्हाला रिवॉर्डचा वापर सहजपणे, योग्यरीत्या व योग्यवेळी करता येणार नाही. ज्या कंपन्यांचे रिवॉर्डवर सवलती देणारे पेट्रोल पंप तुमच्या नेहमीच्या रस्त्यावर आहेत त्या कंपनीचेच कार्ड घ्या. इंधनासाठीचे क्रेडिट कार्ड घेताना त्याचे वार्षिक शुल्क, रिवॉर्डचा दर, रिडम्पशनच्या अटी व नियम, को-ब्रॅण्डेडचे फायदे व इंधन खरेदीशिवाय इतर खरेदींवर मिळणारे फायदे या सर्वांचा विचार करून कार्ड घ्यावे. कार्ड घेण्याचे व नूतनीकरणाचे शुल्क जास्त असेल तर तुम्हाला मिळणार्‍या फायद्यांना काही महत्त्व राहणार नाही.

चौकट
इंधनासाठीच्या क्रेडिट कार्डचे उपलब्ध पर्याय
सुरुवातीच े वार्षिक मासिक रिवॉर्डस् पॉईंट्‌स
शुल्क शुल्क वित्तीय
रुयये रुपये शुल्क
१. बीपीसीएल- एसबीआय ५०० ५०० ३.५० टक्के सुरुवातीचे शुल्क भरल्यास
५०० रुपये मूल्याचे २०००
पॉईंट्‌स मिळतात. यासाठी
बीबीसीएलच्या पेट्रोल पंपचाच
वापर करावयास हवा. ४ पॉईंट्‌सवर
एक रुपया रिवॉर्ड मिळतो.
२. इंडियन ऑईल सिटी १००० १००० ३.७५ टक्के इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर
प्रत्येकी १५० रुपयांना चार टर्बो
पॉईंट्‌स मिळतात. १ टर्बो पॉईंटचे
मूल्य एक रुपया.
३. स्टॅण्डर्ड चार्टर्ड २५० २५० ३.४९ टक्के १५० रुपयांच्या इंधन खरेदीवर
प्लॅटिनम रिवॉर्डस् ५ द रिवार्ड पॉईंट मिळतात.
४. इंडियन ऑईल- ५०० ५०० ३.४९ टक्के आयओसीएच्या पेट्रोल पंपवर
एचडीएफसी ५ टक्के फ्यूअल पॉईंट्‌स मिळतात.
इतर पेट्रोल पंपचा वापर केल्यास
१५० रुपयाच्या इंधन खरेदीवर
१ फ्यूअल पॉईंट.
५. एचडीएफसी ५०० ५०० ३.४९ टक्के इंधनाच्या खर्चावर महिन्याला
कॅश बॅक ५ टक्के कॅशबॅक
६. इंडियन ऑईल- ५०० ५०० ३.४० १०० रुपयांच्या इंधन खरेदीवर
एक्सिस बँक २० रिवॉर्ड पॉईंट मिळतात.
इंधनाच्या व्यवहारांवर ४ टक्के
व्हॅल्यू बँक मिळते.