तियात्र व नाटकांवर सेन्सॉरशीप ही अफवा : भाजप

0
103

तियात्र व नाटक यावर सेन्सॉरशीप लादण्याचा भाजप सरकारचा कोणताही विचार नसून विरोधी कॉंग्रेस पक्षानेच तशी अफवा पसरविली असल्याचा आरोप काल भाजपने पत्रकार परिषदेतून केला. सेन्सॉरशीप बसवणार असल्याचे आम्ही कधी व कुठे म्हटले आहे. त्यासाठी कोणती पावले उचलली आहेत ते कॉंग्रेसने दाखवून द्यावे, असे आवाहन काल पत्रकार परिषदेत भाजप आमदार सुभाष फळदेसाई, नीलेश काब्राल व डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांनी कॉंग्रेसला दिले. लोकांना भाजप सरकारविरुध्द चिथावण्यासाठीच या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप वरील तिघांनी यावेळी केला. दरम्यान, काल कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर व आग्नेल फर्नांडिस यांनी पत्रकार परिषदेत भाजप तियात्र व नाटक यावर सेन्सॉरशीप बसवू पाहत असल्याचा आरोप केला आहे.