आरोग्य कर्मचार्‍यांना देणार कोरोना लशीचा पहिला डोस

0
252

कोरोना लस निर्मितीचे काम आता अंतिम टप्प्यात सुरू असून पुढील काही आठवड्यांत ही लस देशात उपलब्ध होईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली. तसेच सरकारकडून लस देण्याची तयारीदेखील करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
सर्वप्रथम देशातील एक कोटी आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लस टोचण्यात येईल. सार्वजनिक आणि खासगी, अशा दोन्ही क्षेत्रांमधील आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर पोलीस, सशस्त्र दल कर्मचारी आणि महापालिका कर्मचार्‍यांसह आघाडीवर राहून काम करणार्‍या सुमारे २ कोटी लोकांना ही लस दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या सर्वपक्षीय बैठकीत दिली.