Home बातम्या आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवारांची घोषणा

आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप उमेदवारांची घोषणा

0

राज्यात येत्या 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
भाजपच्या गाभा समितीच्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणुकीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. भाजपच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. भाजपकडून निवडणूक प्रक्रियेद्वारे जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. जिल्हा पंचायतीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केल्यानंतर पक्षात बंडखोरी होऊ नये म्हणून प्रयत्न केला जाणार आहे, असेही दामू नाईक यांनी सांगितले.