‘आयसीएसई’ बोर्डाची १०/१२वीच्या परीक्षा पुढे

0
286

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आयसीएसई बोर्डाकडून दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकताच केंद्र सरकारने सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर आता आयसीएसई बोर्डानेही परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. ४ मेपासून ही परीक्षा सुरू होणार होती. त्याचप्रमाणे भारत सरकारने नीट पीजी-२०२१ ही परीक्षाही पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला आहे. ही परीक्षा १८ एप्रिल रोजी होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार आहे.