आयआयटीसाठी जागा निश्‍चित करण्यासाठी तज्ज्ञ समिती ः मुख्यमंत्री

0
91

राज्यात आयआयटीसाठी जागा निश्‍चित करण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
आयआयटी संकुलासाठी शेळ – मेळावली येथे जागा उपलब्ध करण्यात आली होती. तथापि, तेथे आयआयटी संकुल उभारण्यास स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आयआयटी संकुल अन्य ठिकाणी हलविण्याची घोषणा केलेली आहे.

आयआयटी तसेच शिक्षणक्षेत्रातील चार- पाच जणांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती राज्यात आयआयटी संकुल उभारण्याबाबत जागा निश्‍चित करणार आहे. आत्ताच्याप्रमाणे पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तज्ज्ञ समिती स्थानिकांना विश्वासात घेऊन जागेचा प्रस्ताव तयार करणार आहे. राज्यात आयआयटी होणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.