आमदार अपात्रता याचिका उद्या सर्वोच्च न्यायालयात

0
124

उद्या २८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात होऊ घातलेल्या गोव्यातील १० आमदारांवरील अपात्रता याचिकेवरील सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर आजारी पडलेले सभापती राजेश पाटणेकर यांच्या आरोग्यासंबंधीची माहिती तासागणिक देण्याची सोय केली जावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे व गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांच्याकडे ट्वीटद्वारे केली आहे.