सभापती पाटणेकर गोमेकॉत दाखल

0
170

सभापती राजेश पाटणेकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने काल गोमेकॉत दाखल करण्यात आले. ५६ वर्षीय पाटणेकर यांना काल सकाळी डिचोली येथील त्यांच्या निवासस्थानावरून प्रकृती बिघडल्यामुळे गोमेकॉत हलविण्यात आले. त्यांना गोमेकॉतील हृदयरोग विभागात दाखल करण्यात आलेले असून तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पाटणेकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, श्री. पाटणेकर यांनी आपण अपॉइन्टमेंट घेऊन नियमित तपासणीसाठी आलो होतो. मात्र यावेळी डॉक्टरांनी आपणाला काही तपासण्या करून घेण्याची सूचना करुन इस्पितळात दाखल होण्याचा सल्ला दिला. सध्या आपल्याला कोणताही त्रास जाणवत नसून आपली प्रकृती बरी असून लवकरच घरी परतून समाजसेवा करू शकेन, असा ट्वीटरवरून व्यक्त केला आहे. कुणीही भेटीसाठी गोमेकॉत येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.