पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली.
देशातील लोकांनी आमच्या विकासाचे मॉडेल पाहिले, ते समजून घेतले आहे आणि पाठिंबा दिला आहे. आमचे विकासाचे मॉडेल आहे. 2014 नंतर भारताला प्रशासनाचे पर्यायी मॉडेल मिळाले. हे मॉडेल तुष्टीकरणावर (लांगुलचालन) केंद्रित नाही, तर समाधानावर केंद्रित आहे. काँग्रेसच्या काळात प्रत्येक गोष्टीत तुष्टीकरण होत होते. राजकारण करण्याची ही त्यांची पद्धत होती. काँग्रेस मॉडेलमध्ये एक कुटुंबच सर्वप्रथम येते; मात्र आमच्यासाठी देश प्रथम आहे, असे मोदी म्हणाले.
जर आपण आता काँग्रेसचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, त्यांनी अनेक सरकारे अस्थिर केली. ते याच कामात गुंतून राहिले. त्यांच्या या धोरणांमुळेच आज काँग्रेसची ही अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत असलेले लोकही पळून जात आहेत, अशी टीकाही मोदींनी केली.