आप उमेदवाराला जुन्या नोटांद्वारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न

0
50

>> कसून चौकशीची ‘आप’ची मागण

 

आम आदमी पक्षाचे स्थानिक नेते तथा पणजीचे उमेदवार वाल्मिकी नायक यांना जुन्या नोटा बदलून देण्याचे आमिष दाखवून स्टिंग ऑपरेशनद्वारे जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न गेल्या २६ रोजी घडला असून याप्रकरणी त्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर अवस्थी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती नायक यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. सदर व्यक्तीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
भाजप आप उमेदवारांना सतावत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांनाही कथित दवर्ली गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे. सध्या भाजपने सुडाचे राजकारण सुरू केले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.