Home बातम्या आपच्या बंडखोर खासदारांचेसदस्यत्व रद्द करण्यासाठी पत्र

आपच्या बंडखोर खासदारांचेसदस्यत्व रद्द करण्यासाठी पत्र

0

दोन दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच आता आपचे खासदार संजय सिंग यांनी या सर्व बंडखोर खासदारांची राज्यसभा सदस्यता रद्द होणार असल्याचा दावा केला आहे. आता आम आदमी पक्षाचे बंडखोर खासदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी करणार आहे. संजय सिंह यांनी राज्यसभा सभापती सीपी राधाकृष्णन यांना पत्र पाठवून राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेतील त्या 7 खासदारांना अपात्र घोषित करण्याची विनंती केली आहे.

संजय सिंह यांनी दावा केला की राज्यसभेतील या 7 बंडखोर सदस्यांची सदस्यता जाणे निश्चित आहे. या खासदारांचे हे पाऊल पक्षांतरासारखे आहे आणि संबंधित कायदेशीर तरतुदींविरोधात आहे. आम्ही कपिल सिब्बल आणि लोकसभेचे माजी महासचिव तसेच इतर अनेक संविधान तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. सर्वांचे मत आहे की कायद्यानुसार हे सर्व बंडखोर खासदार अपात्र ठरवले जाऊ शकतात.

खासदारांची धाकधूक वाढली
राज्यसभा सभापतींना पाठवलेल्या पत्रात आपने संविधानातील दहाव्या अनुसूचीचा (पक्षांतर विरोधी कायदा) उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या 7 बंडखोर खासदारांची सदस्यता तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.