राळेगणसिद्धी येथे जनलोकपाल विधेयकासाठी उपोषण करीत असलेल्या अण्णा हजारे यांच्या उपोषण स्थळी पोचलेल्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांना काल अण्णा हजारे यांनी फटकारले.
त्यामुळे गोपाल राय यांना माघारी बोलावणे पक्षाला भाग पडले. निवृत्त लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग यांनी आपल्या भाषणात काहीजण अण्णांच्या बरोबर आहोत असे दाखवत होते व नंतर त्यांना धोका देऊन निघून गेले व पक्ष स्थापला असे सांगितल्यानंतर राय यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा अण्णा रागावले. राय यांनी चालते व्हावे असे अण्णा म्हणाले. राय यांना आम आदमी पक्षाने आपला पाठिंबा म्हणून उपोेषणात भाग घेण्यासाठी पाठवले होते.
दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी अण्णांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व डबेवाल्यांनी पाठिंबा व्यक्त केल.