Home बातम्या आद्य गोमंतकीय साहित्यिक कृष्णदास शामांचीतीन हस्तलिखिते पोर्तुगालहून गोव्यात

आद्य गोमंतकीय साहित्यिक कृष्णदास शामांचीतीन हस्तलिखिते पोर्तुगालहून गोव्यात

0

विशेष म्हणजे या ग्रंथालयाच्या पाटो – पणजी येथील नव्या भव्य इमारतीस कृष्णदास शामा यांचेच नाव देण्यात आले असून या इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळीच या हस्तलिखितांंचे प्रकाशन करण्याचा फर्नांडिस यांचा विचार आहे.

दोन वर्षांपूर्वी कृष्णदास शामा यांच्या हस्तलिखितांच्या प्रती पोर्तुगालहून गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रस्ताव कला आणि संस्कृती संचालक प्रसाद लोलयेकर यांच्यासमोर कार्लुस यांनी ठेवला. त्यांनी त्यास मान्यता दिल्यानंतर फर्नांडिस यांनी वरील ग्रंथ मिळवण्यासाठी पोर्तुगालमधील ‘युनिवर्सिदाद दो मिन्हो’ च्या पुराभिलेख विभागाशी म्हणजे ‘आर्किवो डिस्ट्रियाल ब्रागा’ शी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांचे मन वळवण्यासाठी फर्नांडिस यांना बरेच प्रयत्न करावे लागले. कृष्णदास शामा यांचे मूळ हस्तलिखित गोव्यात आणणे हे आपले ध्येय असल्याचे फर्नांडिस सुरूवातीपासूनच सांगत होते. अखेर वरील विद्यापीठाने मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपालांचा हा प्रस्ताव मान्य केला. ७७१, ७७२ व ७७३ या क्रमांकांचे हे खंड असून या तिन्ही ग्रंथांच्या छायाप्रती तयार करण्यास विद्यापीठातील संबंधित विभागाला सहा महिने खर्च करावे लागले असे फर्नांडिस यांनी सांगितले. गेली बरीच वर्षे कृष्णदास शामा यांचे सोळाव्या शतकातील हे साहित्य पोर्तुगालमध्ये पडून असल्याची खंत गोमंतकीयांना होती. मात्र, ते आणण्याच्या दिशेने प्रयत्न झाले नव्हते. वरील विद्यापीठाचे मन वळवण्यासाठी वर्षभर पत्रव्यवहार करावा लागल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.

कृष्णदास शामा यांनी वरील ग्रंथांचे लेखन १६२६ मध्ये सुरू केले होते. पोर्तुगिजांनी तत्कालीन साहित्य नष्ट करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता, परंतु त्यातून तावून सुलाखून ही हस्तलिखिते अखेर पोर्तुगालच्या विद्यापीठाच्या संग्रहात पोहोचली होती.