आणखी एक खाणपट्टा जिंदालकडे

0
15

जिंदाल साउथ वेस्ट (जेएसडब्लू) या कंपनीने गोव्यातील दुसरा खाण पट्टा लिलावात मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. खनिज पट्ट्याच्या लिलावात जेएसडब्लू या कंपनीने उत्तर गोव्यातील हरवळे- कुडणे खाण पट्टा भारतीय खाण ब्यूरोच्या 93.50 टक्के बोली दराने काल घेतला आहे.
हा खनिज पट्टा सुमारे 40 हेक्टरचा आहे. या कंपनीने कुडणे – करमळे खनिज पट्टा 95.65 टक्के दराने मंगळवारी मिळविला आहे. राज्यातील खनिज पट्टा लिलावात मिळविणारी जेएसडब्लू ही गोव्याबाहेरील पहिली कंपनी ठरली आहे. या कंपनीने आत्तापर्यंत दोन खनिज पट्टे मिळविले आहेत.
खाण खात्याने दुसऱ्या टप्प्यातील थिवी-पीर्ण आणि सुर्ला-सोनशी या दोन खनिज पट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. यातील पाचपैकी तीन खनिज पट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अडवलपाल-थिवी हा पट्टा फोमेंतो कंपनीने मिळविला आहे. खनिज पट्ट्याच्या लिलावातील पहिल्या टप्प्यातील चारही खनिज पट्टे गोव्यातील खाण कंपन्यांनी मिळविले
आहेत.