आठ मच्छीमार बुडताना बचावले

0
93

मच्छीमारी बंदी असतानाही खवळलेल्या समुद्रात उतरलेल्या होडीतील आठ मच्छीमार बुडताना येथील मच्छीमार तसेच जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे बचावले. जून व जुलै हे दोन महिने मच्छीमारी बंदीकाळ असून खोल पाण्यात उतरण्यास सक्त मनाई आहे. परंतु ही बंदी झुगारून लुसियान फर्नांडिस हे होडी मालक आपली होडी घेऊन पाण्यात उरतले होते. मात्र, अचानक खवळलेल्या समुद्रात त्यांची होडी उलटून ते सगळे पाण्यात पडले व गटांगळ्या खाऊ लागले. हे दृष्य किनार्‍यावर असलेल्या काही मच्छीमार लोकांनी व दृष्टीच्या जीवरक्षकांनी पाहताच त्यांनी तातडीची मदत देऊन त्यांना पाण्याबाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून हे सगळे आठही जण सहीसलामत बचावले.