आठवी, नववीच्या मुलांनाही कोडिंग, रोबोटिक्स शिक्षण

0
15

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

नुदानित विद्यालयातील ६ वी, ७ वीच्या विद्यार्थ्यांना कोडिंग व रोबोटिक्स शिक्षण देण्यास प्रारंभ करण्यात आल्यानंतर आता ८ वी आणि ९ वी च्या मुलांसाठी कोडिंग व रोबोटिक्स शिक्षण सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सरकारी, अनुदानित शाळांना मोफत डिव्हाईस नोव्हेंबर २०२२ पासून देण्यास प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोडिंग आणि रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स योजनेच्या अधिकारप्राप्त समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यभरातील ६० शाळांची केअर्स योजनेंतर्गत प्रगत अभ्यासक्रमाच्या वितरणासाठी अग्रणी शाळा म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तालुका पातळीवर ऍपेक्स लॅब सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

अभियांत्रिकी आणि संबंधित संगणक विज्ञान पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असलेले प्रशिक्षक प्रगत अभ्यासक्रम देतील. अभ्यासक्रमास नोव्हेंबर २०२२ च्या मध्यापासून सुरू होण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील ५९४० विद्यार्थी आघाडीच्या शाळांमध्ये प्रगत अभ्यासक्रम घेतील. शाळेच्या आयसीटी प्रयोगशाळेच्या अपग्रेडेशनसाठी आयसीटी उपकरण सुरू झाले आहे. आजपर्यंत ६०० आयसीटी उपकरणे ६० प्रमुख शाळांना टप्पा १ चा भाग म्हणून देण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. आयसीटी उपकरणे वितरणाच्या पुढील टप्प्यात ३७०० आयसीटी उपकरणे उर्वरित ३७५ सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांना यंत्रणांना पुरविली जाणार आहे. प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून, अधिकार समितीने टीएफजी-फेलोना राज्यात आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यास मान्यता दिली.
या बैठकीला जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विवेक कामत, समितीचे सदस्य व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.