आज.. करिअर निवडताना…

0
293

– नागेश एस. सरदेसाई (वास्को)

शिक्षणाच्या प्रवासातच एका तरुणाची शेकडो प्रकारच्या लोकांशी गाठ पडते, ज्यांची त्याच्या व्यक्तिमत्वावर छाप पडते. हा प्रकार घरापासूनच चालू होतो. आपण पाहतो की अनेक मुले त्यांच्या आईवडिलांचेच करिअर स्वतःसाठी निवडतात. त्यांना त्यांच्या घराच्या चार भिंतीतंच तसं वातावरण मिळतं, जे त्यांना त्यांच्या आईवडलांच्या पावलांवर पावले ठेवण्याची प्रेरणा देतं.

जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही आणि तुमच्या क्षमता तुम्हाला माहीत होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही की तुम्ही कोणत्या दिशेेने जाणार आहात आणि करिअरच्या विषयामध्ये कोणती गोष्ट तुम्हाला आनंदी व समाधानी ठेवू शकेल! म्हणूनच तुम्ही जेव्हा काहीतरी वेगळं करिअर निवडण्याच्या उंबरठ्यावर उभे असता, त्यावेळी विचार आणि नियोजन करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आहेत. म्हणून कोणाकरता कोणतं करिअर समाधानकारक व पुरस्करणीय राहील हे ठरविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. योग्य करिअरची निवड करणे ही तुमच्यासाठी अतीव महत्त्वाची बाब आहे.
करिअर निवडताना बर्‍याच गोष्टी किंवा घटकांना प्राधान्य दिले जाते जसे – आय (इन्कम), प्रतिष्ठा, आव्हाने, समाधान किंवा सुख. या संदर्भात रोड मॅप बनवणे आवश्यक ठरते आणि तो एखाद्याच्या ऐच्छिक निवडीला कारणीभूत ठरू शकतो. एखाद्याला त्याच्यातील क्षमता, कौशल्ये आणि वैशिष्ट्ये यांद्वारे जाणून घेणे हा पाया आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कामधंद्याचा प्रकार आणि त्याच्या गरजा हा त्याचा गाभा आहे. कोणते काम आपण करू शकू याचा विचार करून स्वतःला त्या जागी ठेवून पहावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा. स्वतःला तिथे ठेवायचे असेल तर बरेच गुणविशेष तुमच्यात असणे गरजेचे आहे – जसे बुद्धीमत्ता, कल्पनाशक्ती, भावना, प्रेरणा, आरोग्य आणि मूल्ये आणि शेवटी अनुभव! यामध्ये भरपूर पायर्‍या चढाव्या लागतात ज्याचे रुपांतरण शेवटी यशामध्ये होईल. प्रत्येकाने त्यासाठी आपल्या आनंदाचा विचार करून एक जवळचे उद्दिष्ट आणि एक दूरचे उद्दिष्ट किंवा ध्येय ठरविण्याची गरज आहे, जे तो आपले व्यक्तिमत्त्व आणि क्षमतांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी वापरू शकतो. कधी कधी एखाद दुसरी नवीन कौशल्ये आपल्या हातात असली तर ती निर्णय घेणे, समस्यांवर उपाय शोधणे किंवा गंभीरपणे विचार करणे यासाठी लाभदायक ठरतात. मिशन लक्षात ठेवूनच तुमच्या भविष्याच्या कार्याचे नियोजन करा. प्रभावी नियोजनच तुम्हाला तुमच्या आवडी व सामर्थ्याचे संपत्तीत रुपांतर करून देईल. कुणा एखाद्याचे विश्‍लेषण किंवा मूल्यांकन करणे हे कधी कधी अतिशय महत्त्वाचे असते. योग्य रोड मॅप तयार करताना लक्षात घेण्याजोगा प्रमुख घटक म्हणजे तुमच्यासमोर कुणा एखाद्या व्यक्तीचा आदर्श आहे का ते बघावे.
२१ व्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात, नोकरीच्या मूलभूत बाबींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणेच खूप महत्त्वाचे ठरते. शिक्षणाच्या प्रवासातच एका तरुणाची शेकडो प्रकारच्या लोकांशी गाठ पडते, ज्यांची त्याच्या व्यक्तिमत्वावर छाप पडते. हा प्रकार घरापासूनच चालू होतो. आपण पाहतो की अनेक मुले त्यांच्या आईवडिलांचेच करिअर स्वतःसाठी निवडतात. त्यांना त्यांच्या घराच्या चार भिंतीतंच तसं वातावरण मिळतं, जे त्यांना त्यांच्या आईवडलांच्या पावलांवर पावले ठेवण्याची प्रेरणा देतं. म्हणूनच आपण बघतो की एकाच घरात डॉक्टर्स, इंजिनिअर्स किंवा वकीलांच्या पिढ्या तयार होतात. पण हा विशिष्ट ट्रेंड आता लोप पावताना दिसत आहे. दुसरीकडे आता अनेक शिकणार्‍या नवतरुणांमध्ये करिअर निवडीच्या बाबतीत द्विधा मनःस्थिती झालेली दिसते. या तरुणांनी त्यांचे ऐच्छिक करिअर त्यांच्या आदर्श व्यक्तिंना बघून निवडायला हवे.
जसे – एखादा विधायक रीत्या आपले माजी राष्ट्रपती अब्दूल कलामांच्या पावलावर पाऊल ठेवू शकतो – ज्यांच्या जीवनाच्या वाटेवर सगळ्यांनी त्यांना वर वर चढताना बघितलं ज्यांनी शेवटी या भूमीवरील अत्त्युच्च शिखर गाठलं. आदर्श व्यक्तिमत्वाची अगदी नक्कलच करायला नको तर त्यांच्यातला उत्साह, उमेद, महत्वाकांक्षा, समर्पण किंवा त्याग आणि त्याला असलेली एखाद्या कार्याबद्दलची ओढ किंवा आवड त्यांनी घेतली तर ऐच्छिक व सर्वोत्तम पातळी गाठायला त्याला मदतच होईल. एखादा त्यांच्या कार्याचा अभ्यास करू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो आणि त्यांच्या कार्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवू शकतो. म्हणूनच विविध क्षेत्रातील मोठमोठी व्यक्तिमत्वे किंवा द्रष्ट्या किंवा मानवतावादी महानुभावांच्या जीवनचरित्रांचा आजच्या तरुणांनी अभ्यास करायला पाहिजे व स्वतःसाठी तसा आराखडा किंवा रोड मॅप बनवला पाहिजे. ही आजच्या काळातील आपल्या तरुणांची गरज आहे की त्यांनी अशा व्यक्तींना शोधून काढायचं ज्यांनी आपापल्या क्षेत्रात यशाचा कळस गाठलेला आहे. यासाठी मुलांच्या पालकांनी त्यांना एखाद -दुसरी थोरामोठ्यांची जीवनचरित्रे भेट म्हणून द्यायला हवीत, जी त्यांना ऐच्छिक यशाची ओळख करून देण्यात मदतगार ठरतील.
एक प्रभावी रोड मॅप आणि एखाद्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची प्रेरणा या दोन गोष्टी आपल्या तरुणांसाठी लगेच फायदेशीर सिद्ध होतील व ते त्यांच्या ऐच्छिक मार्गावर आनंदाने आणि थरारकरीत्या वाटचाल करू शकतील.
स्वयं-विश्‍लेषण किंवा आत्म-परीक्षण करण्याची संकल्पना ही कुठलेही काम करण्याची किल्ली आहे आणि गंभीरपणे जर समजली आणि शास्त्रशुद्धपणे अमलात आणली तर ती एखाद्याच्या करिअरच्या वाटेला आकार देऊ शकते. ही नुसत्या आन्मनिरीक्षणाची गोष्ट नसून ती एखाद्यामध्ये माणूस म्हणून असलेल्या क्षमता व वैशिष्ट्यांचे शास्त्रशुद्ध रीतीने केलेले विश्‍लेषण असते. तसेच ते मानसिक किंवा मानसशास्त्रीय गुणांचे परीक्षण जसे कौशल्य किंवा क्षमता किंवा व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य असते. उदाहरणार्थ – बर्‍याच तरुणांना तंत्रज्ञ बनण्याची इच्छा असते पण त्यांना हेच समजत नाही की त्याच्यातील क्षमता या भरपूर प्रमाणात विशिष्ट गुणांच्या प्रभावाखाली आहेत. आवड किंवा खुणा एवढ्यानेच संपूर्ण व्यक्तिमत्त्व घडत नसते. एखाद्यामध्ये तंत्रज्ञ बनण्याचे प्रथम धाडस हवे, आणि नंतर हळुहळू त्यांच्या मनामध्ये त्याची आवड उत्पन्न होऊन शेवटी ते चांगले तंत्रज्ञ बनतात. पण हे सगळं समजून घेण्याचं काम म्हणजे उंची मोजण्याचा उच्च दृष्टिकोन त्याच्याकडे असायला पाहिजे.
करिअरच्या बाजारात दिसणार्‍या कठीण प्रवृत्तीमुळे आज बरेच तरुण भरकटताना दिसत आहेत आणि मागील २५ वर्षांमध्ये झालेल्या भागधारकांच्या चुका कळण्यास आता फार उशिर झालेला आहे. अभिक्षमता परीक्षा (ऍप्टिट्यूड टेस्ट) घेण्याचे मोजमाप ठरवण्यासाठी एका शास्त्रशुद्ध पद्धतीची गरज आहे व त्यासाठी निरनिराळ्या मोजपट्‌ट्या जसे क्षमता तपासणे, जी पुढे अभिक्षमता परीक्षेद्वारे मिळवता येते. परीक्षा करणे हे कधी कधी फार कठीण होऊन बसतं ज्याच्यामुळे एखाद्याचा कल आपल्याला कळू शकेल आणि या सगळ्या प्रक्रियेत भाषांवरील प्रभुत्व (इंग्रजी), संगणकीय कौशल्ये आणि आकाशीय किंवा अंतरीक्षाबद्दलची ओढ या फार महत्त्वाच्या बाबी आहेत. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कौशल्य असतं. काहीच येत नाही ही वृत्ती म्हणजे आपल्या समाजात असलेली नकारात्मक वृत्ती आहे ज्याचा तरुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यामधील कौशल्ये शोधून काढण्यासाठी एखाद्याच्या क्षमतांचं सरळ आणि काळजीपूर्वक केलेलं विश्‍लेषण त्यांच्यासाठी अनेक दरवाजे उघडून देऊ शकतं. व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमतांंना श्रेण्या द्यायल्या हव्यात ज्यामुळे कुठल्याही क्षेत्रात ते प्रवीण होऊ शकतील. एखाद्याला निश्‍चितपणे कष्ट घेण्याची फार गरज आहे ज्यामुळे प्रत्येकातील क्षमता ओळखून त्यांचा संघ तयार करता येईल. त्यांच्यातील क्षमतांना श्रेण्या देऊन, व नंतर त्यांना सतत तालीम देऊन जसे सराव, किंवा प्राथमिक गोष्टींचे मजबुतीकरण आणि नंतर निवडलेल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ऍप्टिट्यूड म्हणजेच अभिक्षमता ही एक जबाबदारी नसून संपत्ती समजायला पाहिजे जी पुढील काळात सामान्य न राहता सतत वाढत राहील. म्हणूनच क्षमतांना नेहमीच कष्टांची जोड दिली तर मनुष्य एक चांगली तैलीय मशीन बनेल. म्हणूनच आजच्या काळात तरुणांना ज्या पेचप्रसंगांचा सामना करावा लागतो आहे ते लवकरात लवकर संपुष्टात यायला पाहिजेत व त्यासाठी कष्ट घेऊन त्यांना देण्यात येणार्‍या सोयी-सुविधांमध्ये सर्वांगीण सुधारणा झाल्या पाहिजेत. योग्य करिअरच्या संधी उपलब्ध करून देऊन प्रभावी निर्णय घेतल्यास व्यक्तिमत्त्वाचा आलेख सुद्धा पूर्णपणे तपासला व विश्‍लेषिला जाऊन तो समजला जावा. पण शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी जसे माणसातील बदलण्याची क्षमता, परिस्थितीशी जुळवून घेणे व तडजोड करणे या गोष्टी माणसाला यशस्वी बनण्यासाठी बरेच दिवस सहन कराव्या लागतील. त्या माणसाला दुःखी बनवणार नाहीत पण त्याला त्याचे अंतिम स्वप्नाकडे जाणार्‍या वाटा ओळखण्यास शिकवतील.
दुसरी आवश्यक गोष्ट जी प्रभावी करिअर निवडण्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे ‘‘अभिक्षमता’’. न्यूनगंड (इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स) हा आपल्या तरुणांमधील एक घटक आहे जो त्याला सकारात्मक विचार करण्यात अडथळा आणतो.
सर्वांत प्रथम आणि अतिआवश्यक काम म्हणजे आपल्यातील सगळे चांगले गुण-वैशिष्ट्ये व उपलब्धींची यादी करणे होय.
दुसरे – सराव करून तुमच्यातील विलक्षण किंवा दुर्लभ कौशल्यांमध्ये व बुद्धीमत्तेत सुधारणा घडवणे. सकारात्मक गोष्टी पुढे आणणे, किंवा ठळकपणे मांडणे व प्रत्येक संधीबरोबर स्वतःला वर नेणे महत्त्वाचे आहे. या जगातल्या लोकांमध्ये इतकी नकारात्मकता भरलेली आहे की ते सतत एक-दुसर्‍याचे पाय खाली ओढण्यात धन्यता मानतात. स्वयं-सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तरीही कुठलीही समस्या दुर्लक्षित करून चालणार नाही जसे न्यूनगंड. तुम्ही तुमच्याविषयी विचार करण्याची पद्धत बदला, जी तुमच्या लहानपणातील अनुभवांवर आधारित असेल किंवा दुसर्‍यांशी असलेल्या संबंधावर आधारित असेल. जर तुम्ही व्यावसायिक तज्ज्ञांना भेटले तर तुम्हाला खूप प्रोत्साहन दिले जाईल आणि तुम्ही भेटाच! या सर्व प्रक्रियेची कल्पना एक नवीन प्रतिमा घडवण्याचीच नाही तर स्वतचा नवीन दृष्टीकोन तयार करण्याची आहे. त्यासाठी इतर अनेक मार्गही आहेत जसे प्रेरणादायी पुस्तकांचे सकारात्मक वाचन. एक चांगला मित्र हा वाचनालयातील १०० पुस्तके वाचण्याच्या बरोबरीचा असतो. ‘डथजढ’ ऍनालिसीस – स्ट्रेग्थ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रिएट्‌स – ताकद, उणीवा, संधी आणि धोके विश्‍लेषण ही आजच्या काळाची गरज आहे.
आपल्या तरुणांनी मोठा उत्साह दाखवला तर योग्य विश्‍लेषण हे त्यांना बर्‍याच प्रमाणात करिअर निवडण्यास मदतगार ठरेल व नंतर मनःशांती मिळवून देईल व चांगले कामाचे वातावरण देईल. हे यासाठी गरजेचे आहे की गेल्या चार दशकांपासून कोणत्याही व्यक्तीला व्यावसायिक दृष्ट्या आनंदी राहण्यासाठी त्याचे करिअर बनवणे गरजेचे असते. आजचे नवीन युग जरी अत्यधिक बहुआयामी असले तरी लोकं करिअर बनवताना व बदलताना दिसत आहेत, अगदी चाळीशी व पन्नाशीच्या उंबरठ्यावरही! पण या विलक्षण स्पर्धात्मक युगात सगळ्या साधक-बाधक गोष्टींचा विचार करून योग्य प्रतिष्ठेचे करिअर निवडावे ज्याच्यामधून प्रत्येकाला चांगले जिवन जगण्यासाठी काही ना काही मिळेल!!